१३६ किलोचे वजन घटवून केले १०१, वयाच्या ६२ व्या वर्षी तिने पूर्ण केलं जगन्नाथ मंदिर चढण्याचे स्वप्न

Weight Loss Success Story: मुंबईतील एका ६२ वर्षीय महिलेनं एका वर्षात तब्बल ३५ किलो वजन कमी घटवले आहे. या महिलेचं वजन १३६ किलो इतके होते. आता या महिलेचं वजन १०१ किलो इतके झाले आहे.

वजन प्रमाणापेक्षा बाहेर वाढल्यानंतर प्रचंड त्रास होतो आणि बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि जंकफूडचं सेवन यामुळे लठ्ठपणाची समस्या सध्या वाढताना दिसून येत आहे. यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. अशीच एका महिलेची वजन कमी करण्याची ही यशस्वी गोष्ट आहे.

वयाच्या ६२ व्या वर्षी वृद्ध महिलेवर बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची ही Success Story आहे. मुंबईतील एका ६२ वर्षीय महिलेनं बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेद्वारे एका वर्षात तब्बल ३५ किलो वजन कमी केले आहे. शस्त्रक्रियेपूर्वी या महिलेचं वजन १३६ किलो इतके वाढले होते आणि आता या महिलेचं वजन १०१ किलो इतके झाले आहे. लिलावती रूग्णालयातील बॅरिएट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. याविषयी अधिक जाणून घ्या

पार्वती वेणुगोपालन या महिलेनं वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही. वजन वाढल्याने त्यांना चालताही येत नव्हतं. २०२० मध्ये घरच्या घरी आधाराच्या मदतीने चालण्याचा सवय केला. परंतु, घरात चालतानाही तिला अडचणी येत होत्या. दैनंदिन कामे करण्यासाठीही त्यांना कुटुंबियांवर अवलंबून रहावे लागत होते.

बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया अवघड

प्रकृती बिघडत असल्याचं लक्षात आल्यानंतर पार्वती यांनी लिलावती रूग्णालयातील डॉ. शशांक शहा यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टरांनी त्यांना बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार या शस्त्रक्रियेनंतर या महिलेनं सुमारे ३५ किलो वजन कमी केले आहे. जास्त वयात बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करणं हे खूपच अवघड आहे. कारण वृद्ध लोकांसाठी वजन कमी करणे तरुणांपेक्षा खूप कठीण आहे

गंभीर स्वरूपाचा एप्निया

पार्वती यांना गंभीर स्वरूपाचा स्लीप एपनिया आणि पायाला सूज होती. अतिरिक्त वजनामुळे त्यांना बसता किंवा उभं राहता येत नव्हतं. स्वतःच्या पायावर ती कुठल्याही आधाराविना चालू शकत नव्हती. अशा स्थितीत वजन कमी करण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया हाच एक पर्याय होता.

शस्त्रक्रियेनंतर ३५ किलो वजन कमी

पहिल्या १० दिवसांत तिने १० किलो वजन कमी केले आहे. आणि त्यानंतर या महिलेनं तब्बल ३५ किलो वजन कमी केले आहे. या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा स्लीप एप्निया नियंत्रणात आला आहे. इतकंच नाहीतर आता ही महिला कुठल्याही आधाराविना स्वतःच्या पायावर चालू लागली आहे.

वजनामुळे काय होऊ शकते?

डॉ. शहा यांनी सांगितले की, “सध्या लठ्ठपणाची समस्या वाढताना दिसून येत आहे. ताणतणाव हे सुद्धा वजन वाढण्याचे कारण असू शकते. लठ्ठपणामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. याशिवाय लठ्ठपणामुळे गंभीर आजार होऊन मृत्यू होण्याचीही दाट शक्यता असते. त्यामुळे इतकं अधिक वजन कमी करण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय होता.”

पार्वती यांनी सांगितला आपला अनुभव

रूग्ण पार्वती वेणुगोपालन यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,, “वाढलेल्या वजनामुळे दैनंदिन कामं करणंही कठीण झालं होतं आणि खूप निराशही झाले. शस्त्रक्रियेनंतर वर्षभरात ३५ किलो वजन कमी केले असून जगन्नाथ मंदिरातही चढून जाऊ शकले आहे, जे माझ्यासाठी कायम एक स्वप्न होते. आता अजून वजन मी कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.”

काय आहे डाएट प्लॅन

शस्त्रक्रियेनंतर पार्वती यांचा डाएट प्लॅन हा अत्यंत नॉर्मल असून त्यांनी नियमित व्यायाम, चालणे याकडेही लक्ष दिले आहे.

  • नाश्ता - चहा, पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ
  • दुपारचे आणि रात्रीचे जेवण - चपाती, भाजी, भात, आमटी (हेल्दी पदार्थांचा केवळ समावेश)
  • तेल आणि साखरेचा वापर कमी प्रमाणात

वयाच्या ६२ व्या वर्षी अत्यंत स्ट्रिक्ट डाएट करणे योग्य नाही असंही डॉ. शशांक शहा यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

News Link : https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/62-year-old-woman-lost-weight-from-136kg-to-101kg-and-fulfilled-dream-of-climbing-jagannath-temple/articleshow/100263390.cms
CALL NOW BOOK NOW  CHAT