लठ्ठपणा आणि हर्निया

लठ्ठपणा आणि हर्निया

हर्निया म्हणजे नाभीखाली किंवा जांघेत आलेला फुगा होय. हर्नियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. हर्नियाने १४ वर्षांपूर्वी जागतिक विक्रम केला होता. तेव्हा एकूण रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण नव्हते. पण, आता हर्नियाबरोबर लठ्ठपणा प्रकर्षाने जाणवत आहे. लठ्ठ रुग्णावर हर्नियाची शस्त्रक्रिया केली आणि रुग्णाने वजन कमी केले नाही, तर पोटावरील चरबीच्या ताणामुळे परत हर्निया होण्याचा धोका असतो. अशा पुन्हा होणाऱ्या हर्नियाचे प्रमाणही वाढत आहे. आता असे दिसून येते, की पोटात वाढलेल्या चरबीमुळे पोटातील दाब वाढतो. त्यातून ‘हायाटस हर्निया’ नावाचा आजार होतो. या आजारावर वजन कमी करण्याबरोबरच उपचार करणे आवश्याक असते. या आजारात जठर हळूहळू अन्ननलिकेच्या जागेवर हर्निएट होऊ लागते. आजच्या काळात कोणत्याही स्थूल व्यक्तीवर हार्नियाचे उपचार करताना त्या रुग्णाचे वजन कमी करून मगच उपचार करणे आवश्य क झाले आहे. त्यामुळे हर्निया परत उद्‌भवण्याची शक्यपता कमी होते. स्थूल रुग्णांमध्ये अशा शस्त्रक्रिया दुर्बिणीतून करण्यास प्राधान्य द्यायला हवे. कारण, या रुग्णांमध्ये असलेल्या चरबीमुळे जखम भरण्यास त्रास होण्याची शक्यधता असते. त्यामुळे, मोठी चिरफाड न करता कमी छेदातून शस्त्रक्रिया करणे आवश्यनक असते. पोट वाढल्यामुळे नाभीच्या ठिकाणी, जांघेत हर्निया होऊ शकतो. हर्नियावर उपचाराबरोबरच वजन कमी करणेही आवश्यपक आहे.

CALL NOW BOOK NOW  CHAT