लठ्ठपणा आणि हर्निया

लठ्ठपणा-आणि-मधुमेह

भारतामध्ये मधुमेहाच्या ९० टक्के रुग्णांना ‘टाइप २’ प्रकारचा मधुमेह असतो. या रुग्णांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते. लठ्ठपणा आणि मधुमेह एकत्र आला, की व्यक्तीला खूप भूक लागते. गोड खाण्याची इच्छा होऊ लागते. अतिलठ्ठ व्यक्तीला मधुमेह झाल्यानंतर वेगवेगळ्या संप्रेरकाच्या प्रभावामुळे आहाराची शिस्त पाळणे अत्यंत अवघड किंबहुना अशक्यल होते. त्यामुळे, मधुमेहाची भविष्यात होणारी गुंतागुंत लवकर उद्भघवण्याची शक्यअता असते. आधुनिक काळात वैद्यकशास्त्रात झालेल्या नवीन संशोधनानुसार, तसेच अमेरिकन डायबेटिक असोसिएशनच्या नवीन मार्गदर्शन तत्त्वानुसार पोट अधिक सुटलेल्या अतिलठ्ठ व्यक्तीला टाइप २ प्रकारचा मधुमेह असेल, तर मेटॅबोलिक सर्जरी हाच त्यावरचा प्रभावी उपाय आहे. मधुमेह औषधांनी नियंत्रित होत नसेल, तसेच पुरुषांमध्ये मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत वाढत असेल, तर या शस्त्रक्रियेचा फायदा होता. त्याचप्रमाणे, स्त्रियांमध्ये लघवी नियंत्रित न होणे, पायाच्या नसा बधिर होणे, डोळ्यांवर दुष्परिणाम होणे अशा वेगवेगळ्या समस्या तीव्र होऊ लागल्या, तर अशा रुग्णांना मेटॅबोलिक सर्जरीमुळे त्यांची तीव्रता कमी करता येते. मधुमेहामुळे अतिलठ्ठ व्यक्तीचे क्रियाटिन वाढू लागले तर मूत्रपिंडाच्या संरक्षणासाठी ही शस्त्रक्रिया उपयुक्त ठरते. मधुमेह तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार रुग्णाचा बीएमआय ३० पेक्षा जास्त असेल आणि त्याला टाइप २ मधुमेह असेल तर मेटॅबोलिक आणि बेरियाट्रिक सर्जरीमुळे रुग्ण या विकारापासून मुक्त होऊ शकतो. एकेकाळी टाइप २ मधुमेहावर उपचार नाही, असे मानले जात होते. पण, या शस्त्रक्रियांमुळे आता वैज्ञानिक पद्धतीवर आधारित उपचार शक्यह झाले आहेत.

CALL NOW BOOK NOW  CHAT