लठ्ठपणामुळे तुम्ही ग्रस्त असाल किंवा तुम्हाला तुमचा लठ्ठपणा/वजन कमी करायचे असेल तर बॅरिऍट्रिक सर्जरी हा एक चांगला उपाय तुमच्यासमोर आहे. ह्या सर्जरीमुळे लठ्ठपणामुळे पुढे उद्भवू शकणाऱ्या कॅन्सरची शक्यता कमी होते तसेच हृदयरोग, स्लीप अप्निया, टाइप २ मधुमेह, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर, ब्रेन स्ट्रोक यांसारख्या विविध आजारांचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त अजूनही बरेच आजार लठ्ठपणाशी निगडित आहेत त्यांचाही धोका कमी होतो. लठ्ठपणा हा प्रमुख आजारांपैकीच एक आहे पण लोकं तसे मानत नाहीत ही खरंतर दुर्दैवी बाब आहे.
हा लेख डॉक्टर शशांक शहा ह्यांचा आहे, ह्यामध्ये त्यांनी बॅरिऍट्रिक सर्जरी विषयी काही महत्वाच्या बाबी स्पष्टं केल्या आहेत, ह्या सर्जरीची गरज काय, त्याचे प्रकार कोणते आणि ह्याबद्दल लोकांच्या मनात असलेल्या सामान्य प्रश्नांना उत्तरे दिली आहेत, लठ्ठपणा बाबतीत महत्वाच्या असलेल्या गोष्टीही त्यांनी इथे सांगितल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने ही माहिती जरूर वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंतपण पोचवा.