लहान मुलांमध्ये छातीचे प्रमाण वाढताना दिसतं, मुलींमध्ये चेहऱ्यावर केस येतात. त्यावरच्या उपचारांचे प्रमाण वेगाने वाढताना आपल्या दिसते. चेहऱ्यावर पिंपल्स येतात. पॉलिसिस्टीक ओव्हरियन डिसिज (पीसीओडी) वाढतोयं. पूर्वी प्रसूतीनंतर महिलांना येणारे स्ट्रेच मार्क आता लहानपणीच मुलांच्या अंगावर दिसत आहे. या सगळ्याच्या उपचारांसाठी पालक वेगवेगळ्या ठिकाणी धावताना दिसत आहे. ही सगळी लक्षणे म्हणजे शरीरातील चयापचयाची क्रिया बदल असल्याची ठळक लक्षणे आहेत. त्यातून स्थूलता वाढत असल्याचे संकेत यातून शरीर देत असते. हीच रुग्णाला शास्त्रिय उपचार देण्याची योग्य वेळ असते.
सध्या कोणत्याही शाळेतील 35 ते 40 मुलांच्या वर्गात डोकावलं की, जाणवते निम्मी मुलं ही जाड आहेत. जाड म्हणजे सुदृढ असा याचा अर्थ होत नाहीत. तर, त्याचा अर्थ स्थूल असा होतो. आणि नेमकी हिच समस्या वयाच्या चाळिशी-पंचेचाळीशीच्या पालकांना भेडसावत आहेत. पण, या समस्येचं मूळ नेमकं कशात आहे, हा प्रश्न आपल्याला पडतो नं? खरंतर, जगभरात लहान मुलांमधील स्थूलता ही एक लाट निर्माण होत आहे. त्याचा थेट संबंध हा त्यांच्याशी करियरशी जोडला जातोय. मुलांच्या डोक्यावर करियर नावाचं ओझं ठेवलं जातं. त्यात त्यांचं बालपण कोमेजून जातंच, तसेच त्यांचे शरीराचेही मोठं नुकसान होतं. हे कसं काय, असा पुढचा प्रश्न तुम्हाला पडला असेल नं?
इयत्ता सातवी, आठवीपासून "आयआयटी फाउंडेशन' कोर्स सुरू होतात. एकीकडे शाळेचा अभ्यास, दुसरीकडे करियरची तयारी यात मुलं अडकतात. शाळा, क्लास, फाउंडेशन कोर्स यात एक-एक दिवस जातो. एकेका परीक्षेच्या अभ्यासात वेळ जातो. खेळणे, व्यायाम यापासून मुलं दूर राहातात. या सगळ्याचा परिणाम दहा-बारा वर्षांनंतर मुलांवर दिसायला लागतो. त्यामुळे या वर्गातील मुलं आपल्याला जाड दिसतात.स्थूलता हा एक आजार आहे. घरातील दोनपैकी एक मुलगा लठ्ठ असले. तर, तो त्याचा दोष कसा समजायचा? दुसरा मुलगा घरात जे खातो, जे पितो, जशी त्याची जीवनशैली आहे, तशीच या लठ्ठ मुलाचीही आहे. मगं फरक कुठे पडतो? फरक पडतो, तो आपल्या शरीरामध्ये! त्यातूनच स्थूलता या आजाराची जगभर लाट निर्माण होत आहे.
कृत्रिमपणे पिकविण्यात येणारी फळे, उत्पादन वाढीसाठी सर्रास वापरली जाणारी औषधे, गाईचे दूध वाढविण्यासाठी दिली जाणारे इंजेक्शने या सर्वांचे परिणाम आता आपल्याला दिसू लागला आहे. वर्गातील स्थुलांची वाढणारी संख्या हे त्याचेच एक दृष्य रूप आहे!